दिव्य मराठी अपडेट्स: एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले, मध्य प्रदेशातील भयंकर घटना - Mumbai News (2024)

.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर...

अपडेट्स...

एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले

भोपाळ - एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळल्याची भयंकर घटना मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे घडली आहे.

अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रावडी गावात रविवारी ही घटना घडली. ती सोमवारी उजेडात आली. मृतांत कुटुंब प्रमुख राकेश, त्यांची पत्नी ललिता, मुलगी लक्ष्मी आणि अक्षय व प्रकाश या दोन्ही मुलांचा समावेश आहे. नातलगांनी या सर्वांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. पण पोलिसांनी तपास केल्यानंतरच हे प्रकरण हत्या की आत्महत्येचे आहे हे स्पष्ट होईल असे सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 30 जून 2018 रोजी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरात 10 जणांचा मृतदेह लटकलेल्या स्थिती आढळले होते. त्यानंतर बरोबर 6 वर्षांनी ही भयंकर घटना घडली आहे.

दीक्षाभूमीचे ट्रस्टी जनतेच्या भावनांशी का खेळत आहेत?

दिव्य मराठी अपडेट्स: एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले, मध्य प्रदेशातील भयंकर घटना - Mumbai News (1)

पुणे - दीक्षाभूमीवर पार्किंग होणार असल्याचे जाहीर झाले तेव्हापासून लोकांनी त्याला विरोध केला. लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टींनी हे कामकाज करायला नको होते. पण त्यानंतरही ट्रस्टी हे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी एका व्हिडिओद्वारे केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्ही लोकांच्या भावनांशी का खेळत आहात? असा प्रश्न या प्रकरणी ट्रस्टींना विचारला पाहिजे. विजयादशमीला लाखो लोक येतात यामध्ये दुमत नाही, पण आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी कुणीही तक्रार केली नाही. पार्किंगच्या नावावर जे व्यावसायीकरण केले जात आहे, ते थांबवण्यासाठी नागपूरची जनता आंदोलन करत आहे. त्यामुळे पार्किंगचे काम तत्काळ थांबवावे. त्याची काहीच आवश्यकता नाही. हे काम थांबवले नाही तर जनता विरोधात जाईल हे स्पष्ट आहे, असे आंबेडकर म्हणाले.

मंडे मेगा स्टोरी- विवाहितेला फुस लावल्यास तुरुंगवास

आता जर खून झाला तर कलम 302 नव्हे तर 101 कलम लावले जाईल. फसवणुकीसाठी लागणारे कलम 420 आता 318 झाले आहे. बलात्काराचे कलम आता 375 नाही तर 63 झाले आहे. विवाहित महिलेला फूस लावणे हा आता गुन्हा आहे, तर जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंध यापुढे गुन्ह्याच्या श्रेणीत येणार नाही. वाचा सविस्तर

गट 'क'च्या रिक्त पदांची भरती आता MPSC तर्फे होणार

मुंबई - राज्य सरकारने 77 हजार 305 लोकांना नोकरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात 1 लाख पेक्षा जास्त भरती केली असून हा विक्रम असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारच्या वतीने गट 'क' च्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पेपरफुटी संदर्भातील कायदा याच अधिवेशनात आणणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर

भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून महिलेला मारहाण

दिव्य मराठी अपडेट्स: एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले, मध्य प्रदेशातील भयंकर घटना - Mumbai News (2)

बुलढाणा - महिलेच्या अंगातील भूतबाधा पळवून लावण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने महिलेला मारहाण केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथे घडली आहे.

शिवाजी बर्डे उर्फ शिवा महाराज असे या महाराजाचे नाव आहे. त्यांनी एका महिलेच्या अंगातील भूत उतरवण्याच्या नावाने तिला मारझोड केली. पीडित महिला कोण आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या महाराजावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे याच महाराजाचा दारू सोडवण्याच्या नावाने एका व्यक्तीला मारहाण केल्याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी राजेश राठोड नामक व्यक्तीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RSS च्या इशाऱ्यावर NCERT ची पुस्तके बदलली जात आहेत का?

'NCERT ही आता व्यावसायिक संस्था राहिलेली नाही. ती 2014 पासून RSS ची संलग्न संघटना म्हणून काम करत आहे. अलीकडेच हे उघड झाले आहे की त्यांच्या 11व्या सुधारित राज्यशास्त्राच्या पुस्तकात धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेवर टीका केली आहे. NCERT चे काम पुस्तके तयार करणे आहे, राजकीय पत्रिका आणि प्रचार नाही. वाचा सविस्तर

विधानसभेत जुन्या पेन्शनवर चर्चा

मुंबई - विधानसभेत आज सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्यावर गरमागरम चर्चा झाली. सरकार या प्रकरणी केव्हा निर्णय घेणार? असा सवाल काही सदस्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकार या प्रकरणी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेईल, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. वाचा सविस्तर

भुशी धरणात तिघांचे मृतदेह सापडले

पुणे - लोणावळा शहरा जवळील नामांकित भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहातून 5 पर्यटक भूशी धरणात वाहून गेल्याची घटना रविवारी घडली होती. यामध्ये आत्तापर्यंत तीन जणांचे मृतदेह आढळले आहेत. तर दोन चिमुकल्यांचा अद्याप शोध सुरू आहे. याठिकाणी अजूनही शोध मोहीम सुरू आहे. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. वाचा सविस्तर

गोलंदाजांच्या जोरावर भारत विश्वविजेता

क्रीडा डेस्क - भारत दुस-यांदा T-20 क्रिकेटचा विश्वविजेता बनून 24 तासांहून अधिक काळ लोटला आहे. भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. तथापि, हा विजय आणि हे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वात महत्वाच्या पात्रांबद्दल कदाचित तुम्हाला अद्याप तितके माहित नसेल.

ते सर्व संघाचे गोलंदाज आहेत, ज्यांनी प्रत्येक सामन्यात विरोधी संघाच्या जबड्यातून विजय हिसकावून दिला. या कथेत, T-20 विश्वचषकातील या गोलंदाजांची कामगिरी आणि 11 वर्षांनंतर भारताने ICC ट्रॉफी जिंकून तेच खरे पात्र का ठरले हे आपण जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर

व्यावसायिक गॅस सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली - नवीन महिना म्हणजे जुलै महिना आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता तुम्ही PhonePe, Cred, BillDesk सारख्या फिनटेक कंपन्यांद्वारे 26 बँकांचे क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकणार नाही. वाचा सविस्तर

विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण

दिव्य मराठी अपडेट्स: एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले, मध्य प्रदेशातील भयंकर घटना - Mumbai News (3)

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधावरून एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्याच कार्यकर्त्याने उघडपणे ही मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

गत 28 रोजी पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे साळिशी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पीडित जोडप्याच्या विवाह्यबाह्य संबंधांची चर्चा सुरू होती. यावेळी जवळपास 200 जणांच्या उपस्थितीत या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. ताजिमूल इस्लाम असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. भाजप व सीपीआयने या प्रकरणी सत्ताधारी तृणमूलवर निशाणा साधला आहे. तर हा प्रकार समर्थनीय नसल्याचा घरचा आहेर तृणमूलच्या नेत्यांनी दिला आहे.

अतिरेक्याची मदत करणाऱ्याला अटक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी सोपोर परिसरात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. सोमवारी रात्री उशिरा पोलिस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानांनी सोपोरच्या बोमई भागातील माचीपोरा येथे संयुक्त कारवाई केली. दरम्यान, चौकीत तपासणी सुरू असताना बोमईकडून माचीपोराच्या दिशेने येणारे एक वाहन अडविण्यात आले. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पकडला गेला.

वहीद उल जहूर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, रफियााबाद, बारामुल्ला येथील रहिवासी आहे. वाहिदकडून दोन तुर्की पिस्तूल, तीन मॅगझिन, 41 राउंड, एक सायलेन्सर, दोन चिनी ग्रेनेड आणि आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मथुरेत पाण्याची टाकी कोसळली, 2 ठार, 10 जखमी

दिव्य मराठी अपडेट्स: एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले, मध्य प्रदेशातील भयंकर घटना - Mumbai News (4)

मथुरा - काठोकाठ भरलेली एक मोठी पाण्याची टाकी मथुरेत कोसळली. या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले. डीएम शैलेंद्र कुमार सिंह, एसएसपी शैलेश पांडे आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. जेसीबी मागवण्यात आला आहे. लष्कर आणि एनडीआरएफही पोहोचले आहेत.

एका कुटुंबातील 4 जखमींसह 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र, अधूनमधून पडणारा पाऊसही टाकी कोसळण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. प्रकरण कृष्णा बिहार भागातील आहे.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. डीएम म्हणाले की, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचावासाठी जेसीबी मागवण्यात आला आहे. लष्कर आणि एनडीआरएफचे पथकही पोहोचले आहे. ...ng>...

भुशी धरणात बुडून 5 जणांचा मृत्यू

दिव्य मराठी अपडेट्स: एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले, मध्य प्रदेशातील भयंकर घटना - Mumbai News (5)

पुणे - महाराष्ट्रात रविवारी (30 जून) धबधब्यात पडून 5 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, पुण्यातील लोणावळा परिसरातील भुशी धरणाजवळील एका धबधब्यावर दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बचाव पथकाने धबधब्यातून एक महिला (40), एक 13 वर्षांची मुलगी आणि 4-6 वर्षे वयोगटातील तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

दिव्य मराठी अपडेट्स:  एकाच घरात 5 जणांचे मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले, मध्य प्रदेशातील भयंकर घटना - Mumbai News (2024)

References

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Greg Kuvalis

Last Updated:

Views: 5644

Rating: 4.4 / 5 (55 voted)

Reviews: 86% of readers found this page helpful

Author information

Name: Greg Kuvalis

Birthday: 1996-12-20

Address: 53157 Trantow Inlet, Townemouth, FL 92564-0267

Phone: +68218650356656

Job: IT Representative

Hobby: Knitting, Amateur radio, Skiing, Running, Mountain biking, Slacklining, Electronics

Introduction: My name is Greg Kuvalis, I am a witty, spotless, beautiful, charming, delightful, thankful, beautiful person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.